दोडामार्ग :
झोळंबे येथील ३३ वर्षीय सुनेश उदय गवस याची प्रकृती गंभीर असून तो सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. गेल्या वर्षभरापासून त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याची आई उर्मिला गवस यांनी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये २८ एप्रिल रोजी मुख्यमंत्री सहायता निधीतून शस्त्रक्रिया होणार आहे. मात्र, शस्त्रक्रियेनंतरच्या सहा महिन्यांच्या औषधोपचारांसाठी सुमारे ५ लाख रुपयांची गरज आहे.
सुनेश हा कुटुंबाचा एकमेव आधार होता. गोव्यात नोकरी करत तो पत्नी, चार वर्षांची मुलगी आणि वृद्ध आईचा सांभाळ करत होता. दीर्घकालीन उपचारांमुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
त्याच्या उपचारांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
💰 मदतीसाठी तपशील :
नाव : सुनेश उदय गवस
बँक : बँक ऑफ इंडिया, शाखा – बांदा
खाते क्रमांक : 146510510000663
IFSC : BKID0001410
गुगल पे : 9405152275
संपर्क : 8999456749
आपली छोटीशी मदतही या कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते.
आईची किडनी दान; मुलाच्या उपचारांसाठी ५ लाखांची गरज…
