Headlines

Global Maharashtra Breaking News

पथनाट्य स्पर्धेत अणसूरपाल द्वितीय

वेंगुर्ला ता.०९-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बॅ.खर्डेकर महाविद्यालयाने पर्यावरणावर आधारित घेतलेल्या पथनाट्य स्पर्धेत अणसूरपाल हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकाविला. या पथनाट्य स्पर्धेत ऋतुजा आमडोसकर, वैष्णवी गावडे, शिवांगी अणसूरकर, पायल गावडे, तनिषा गावडे, भौतिका गावडे, अर्पिता कोरगांवकर, सिद्धी परब या नववीतील विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. यांना स्वाती देऊलकर हिचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थीनींचे अभिनंदन करण्यात आले…

Read More

महिलांनी ध्येय निश्चित करून काम केल्यास यश निश्चित:स्मिता नलावडे

असलदे ग्रामपंचायत आयोजित महिला दिनानिमित्त स्पर्धांच्या विजेत्यांचा गौरव कणकवली ता.०९-:* असलदे गावात ३६ बचतगट आहेत, महिलांना संघटीत केलं जातं आहे.ही चांगली गोष्ट आहे.असलदे ग्रामपंचायतने महिला दिनानिमित्त चांगले कार्यक्रम आयोजित केले,त्याबद्दल सरपंच पंढरी वायगंणकर यांचे कौतुक आहे.असलदे गावाचे दिविजा वृद्धाश्रमाने नावलौकिक वाढवले आहे.त्यामुळे महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ध्येय निश्चित केले,तरच यश निश्चित आहे, असे प्रतिपादन…

Read More

विरोधी नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे महाविकास आघाडीचे कारस्थान धक्कादायक  

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे प्रतिपादन   कणकवली ता.०९-:* तपासी यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना बनावट पुरावे तयार करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे सत्ताधारी महाविकास आघाडीचे कारस्थान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणले आहे. विरोधकांना नष्ट करून लोकशाही उध्वस्त करण्याच्या या धक्कादायक प्रकाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष…

Read More

मार्शल आर्टच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी कासार्डेत जागतिक महिला दिन उत्साहात

कणकवली ता.०९-:* कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनींने जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे (जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग )यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार महिला दिनाचे औचित्य साधून कासार्डे माध्यमिक विद्यालयात स्वसंरक्षण अतंर्गत ज्यूदो-कराटे,लाठी-काठी, या सारख्या अनेक मार्शल आर्टची चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी व योगा,रोपस्किपिंगच्या बहारदार सादरीकरणासह विद्यालयातील खास मुलींसाठी १००मीटर धावणे, संगीत खुर्ची स्पर्धा,पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,…

Read More

डॉ सोनाली तेली यांचा महिला दिनी सत्कार

मानवी हक्क राजदूत संघटनेची सामाजिक बांधिलकी देवगड आंतरराष्ट्रीय मानवी हक्क राजदूत संघटना शाखा देवगड तालुक्याच्यावतीने जागतिक महिला महिला दिनाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील मोंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रथम वर्ग वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनाली तुकाराम तेली यांचा संघटनेच्या देवगड तालुका महिलाध्यक्षा सौ.दीक्षा तेली यांच्या हस्ते शाल-श्रीफळ गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड…

Read More

स्मिता नाईक ठरल्या होम मिनिस्टर

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे आयोजन सिंधुदुर्गनगरी ता.०९-:* महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपला आर्थिक विकास साधला आहे.त्यांच्या आर्थिक विकासाला जिल्हा बँक सर्वोतोपरी मदत करणार असुन जिल्ह्यातील प्रत्येक महीला यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण यांनी यांनी ओरोस येथे केले. ८ मार्चला महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने येथील अध्यापक…

Read More

पथनाट्य स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलचे यश

वेंगुर्ला ता.०९-:* जागतिक महिला दिना निमित्ताने बॅ.खर्डेकर महाविद्यालय आणि वेंगुर्ला नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या पटनाट्य स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाने यश संपादन करत तृतीय क्रमांक पटकवला. ‘महिला आणि पर्यावरण‘ या विषयावर हे पटनाट्य सादर करताना कृपा, साक्षी, प्रतीक्षा, ऋचा, रुचिरा, जान्हवी, आर्या, अनुष्का आणि संस्कृती या मुलींनी यात सहभाग घेतला होतो. या…

Read More

लावण्यसिंधुतर्फे 12 मार्चला महिला दिन कार्यक्रम

कणकवली ता.०९-:* लावण्यसिंधु लोककला व चित्रपट सहकारी संस्थेतर्फे गतवर्षी प्रमाणे यावर्षी जागतिक महिला दिन कार्यक्रमांचे आयोजन येत्या शनिवार 12 मार्च 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता श्री.भवानी सभागृह,तेलीआळी, कणकवली येथे आयोजित करणेत आला असून यावेळी सांस्कृतिक क्षेत्रातील महिला व मुलीनी उपस्थित रहावे असे आवाहन लावण्यसिंधु चित्रपट संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर,संचालिका सौ. अक्षता कांबळी व सौ. प्रांजल…

Read More

आव्हानांचा सामना केला तरच जीवनात यशस्वी व्हाल : माधुरी शानभाग

कळसुलकर हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिनाचे आयोजन सावंतवाडी ता.०९-:* आव्हानांचा सामना केला तरच जीवनात यशस्वी व्हाल, प्रत्येकाने वाचन केलेच पाहिजे,वाचन हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका माधुरी शानभाग यांनी केले. प्रशालेतील मराठी विभाग व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कळसुलकर हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला,…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सुविधा द्या…

काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांची राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी तालुक्यासह शहरातील रुग्णास सेवेकडे लक्ष देण्याची विनंती आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे याबाबतचे लेखी निवेदन काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी राज्याचे ग्रह गृहनिर्माण परिवहन राज्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे केली आहे…

Read More
You cannot copy content of this page