उन्नत्ती केरकर ठरल्या पैठणीच्या मानकरी
*⚡वेंगुर्ला ता.०९-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चा वेंगुर्ल्याच्यावतीने आयोजित केलेल्या ‘होममिनीस्टर – खेळ पैठणीचा‘ या स्पर्धेत उन्नत्ती केरकर या पैठणीच्या मानकरी ठरल्या. ही पैठणी पॉप्युलर क्लॉथ स्टोअर्सचे अमर दाभोलकर यांनी पुरस्कृत केली होती. ८ मार्च रोजी साई मंगल कार्यालयात झालेल्या या स्पर्धेत ६५ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उद्घाटन कृतिशील शिक्षिका प्राजक्ता आपटे…
