तळवडे ग्रामपंचायतीला मिळाला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी
पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांच्या प्रयत्नांना यश सावंतवाडी दि.१९ नोव्हेंबर (प्रतिनिधी) तळवडे ग्रामपंचायतीला तब्बल एक वर्ष पाच महिन्यानंतर कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी मिळाले आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशाने व शिवसेना तालुकाप्रमुख, पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे गावच्या विकासाला दिशा मिळेल असा विश्वास तळवडे गावातील नागरिकांनी व्यक्त केला…
