कणकवली ता.११-:* कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील बौध्दवाडी येथील सुमारे ३१ नागरीकांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकचे नूतन संचालक व शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. पक्ष प्रवेशामध्ये युवक – युवती आणि महिला – पुरुष व जेष्ठ नागरिकांचा देखील सहभाग होता.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, कणकवली शिवसेना उपतालुकाप्रमुख महेश ऊर्फ गोट्या कोळसुलकर तसेच नडगिवे शाखाप्रमुख विलास करंगुटकर यांच्या कार्यपध्दतीवरती विश्वास ठेवून नडगिवे बौध्दवाडीतील नागरीकांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला असल्याची माहिती खारेपाटण – तळेरे शिवसेना उपविभाग प्रमुख दयानंद कुडतरकर यांनी दिली.
नडगिवे बौद्धवाडी येथील शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने किर्तीकांत जाधव , हरेश पगारे, यशवंत पगारे , अनंत पगारे, महादेव पगारे , सखाराम जाधव , अभिषेक जाधव , विनय पगारे , अभिजीत पगारे , अनिकेत पगारे , रोहित पगारे , तुषार पगारे , विवेक पगारे , रोहन जाधव , सत्यवान पगारे , श्रृती जाधव , प्रिया पगारे, तेजल पगारे , आकांक्षा जाधव , लता पगारे , प्रज्ञा पगारे , प्राची जाधव , वनिता पगारे , सुषमा पगारे , ऋतीका जाधव , कादंबरी पगारे , निता पगारे , आर्यन जाधव , तन्मय पगारे , दिनेश पगारे , सदाशिव पगारे इ . नागरीकांनी शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून व हातात शिवबंधन बांधून व हातामध्ये भगवा झेंडा घेऊन शिवसेनेत प्रवेश केला . यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी नडगिवे बौद्धवाडीतील नागरिकांचे शिवसेना पक्षात आल्याबद्दल स्वागत केले. व पक्षाच्या वतीने येणाऱ्या काळात सर्वतोपरी सहकार्य येथील नागरिकांना करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर, उपविभाग प्रमुख दयानंद कुडतरकर शिवसेना युवा कार्यकर्ते संतोष लोकरे , संकेत लोकरे, भुषण कोळसुलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
