भाजपची मागणी; अन्यथा करणार आंदोलन…
सावंतवाडी ता.११-:* शहरातील अनेक शाळा व महाविद्याल मध्ये सद्य स्थितीत १२ विची परीक्षा सुरू असून, येत्या दोन तीन दिवसात १० वीची परीक्षा सुरू होणार असून, या कालखंडात महावितरण कंपनीने लाईट न काढता विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सहकार्य करावे व लाईट गेल्याने विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी त्यांनी याबाबत वरिष्ठांशी बोलून योग्य तो निर्णय घ्यावा, परीक्षा कालावधीत लाईट गेल्यास भाजप कडून लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी अजय गोंदावळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित आदी पदाधिकारी उपस्थित होते.
