श्रावण गावात वनभोजनतून सहस्नेहभोजन आदर्श उपक्रम

कणकवली ता.११-:* मालवण तालुक्यातील श्रावण गावात वनभोजनातून सहस्नेहभोजन हा आदर्श उपक्रम श्रावण नदीवाडी येथील संदीप जठार यांच्या बागेमध्ये संपन्न झाला. या वनभोजनाचे वैशिष्ट्य म्हणजे महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1, श्रावण गवळीवाडी या दोन्ही शाळांचे सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि गावातील सर्व कर्मचारी असे एकत्रित सहस्नेहभोजन घेण्यात आले होते. या वनभोजनासाठी श्रावण गावचे सरपंच प्रशांत परब, उपसरपंच प्रमोद घाडी , कृष्णा हरणे , स्वप्नील दळवी , संदीप जठार , आरती परब ,नेत्रा परब , प्रकाश गवस , समीर सडेकर संदीप उर्फ बापू परब, ज्योती बुटे, दर्शना हावळ, नम्रता मुद्राळे, नुतन श्रावणकर, साक्षी यादव आणि यंगस्टार मित्रमंडळ श्रावण यांनी सहकार्य केले. सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी मडके फोडी, क्रिकेट, लंगडी असे विविध खेळ घेण्यात आले.

तर पालक आणि विद्यार्थ्यांसाठी रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर श्रावण दळवीवाडी, घाडीवाडी अंगणवाडीच्या ताई पायल परब यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा आदर्श अंगणवाडीताई पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रप्रमुख नितीन कदम व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वनभोजनाच्या कार्यक्रमाला गावचे सरपंच प्रशांत परब, उपसरपंच प्रमोद घाडी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, केंद्रप्रमुख नितीन कदम, ग्रामसेवक व्हि. व्हि. रावले, मंडळ अधिकारी सुनील पवार, तलाठी लक्ष्मण देसाई, श्रावण सोसायटीचे सचिव विश्राम कदम, दोन्ही शाळांच्या अध्यक्ष शिवराम परब, जगदीश चव्हाण, दोन्ही शाळांच्या व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर, मुख्याध्यापक प्राजक्ता कोळंबकर, शिक्षक विनायक हरकुळकर, साक्षी कुबल, रागिणी ठाकूर, सचिन घोटाळे, रामचंद्र कुबल, विलास बोंडे, जीवन हजारे, पोषण आहाराच्या रोहिणी पवार, सुवर्णा दळवी, विशाखा गवळी, सर्व पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी सर्वांचे शाळांच्या वतीने आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page