निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधीची आश्वासन देऊन आमदार केसरकर करत आहेत जनतेची दिशाभूल…

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टीका…

सावंतवाडी ता.११-: निवडणुकीच्या तोंडावर आमदार दिपक केसरकर गावागावात जाऊन कोट्यवधीच्या विकास कामाची घोषणा करतात मात्र प्रत्यक्षात मात्र एक ही विकासकाम सावंतवाडी मतदारसंघात झाले नसून, फक्त निवडणुकीच्या तोंडावर लोकांची दिशाभूल करून मत मिळवण्याचा प्रयत्न आमदार दीपक केसरकर करत असल्याची टीका राजन तेली यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार केसरकर यांच्यावर केली आहे.

तसेच ते बोलताना पुढे म्हणाले कीयापूर्वी आमदार दीपक केसरकर यांनी युवकांना नोकरी, कारखाने, मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, यासारखी अनेक आश्वासने हवेत विरली असून, भाजपचे मुख्यमंत्री असताना चांदा ते बांदा ही योजना निर्माण केली होती. परंतु, आताचा सरकारचा आमदार दीपक केसरकर यांच्या वर विश्वास नसल्याने त्यानी ही योजना बंद केली आहे. तसेच आमदार दीपक केसरकर यांना मंत्रीपद देखील नाकारण्यात आले आहे. विकासाच्या गोष्टी करणाऱ्या आमदार दिपक केसरकर यांच्या मुळेच तालुक्यातील विकासाची दयनीय परिस्थिती झाली असल्याचा आरोप देखील यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे. आमदार दीपक केसरकर यांचा प्रशासनावर अंकुश नसल्यानेच कोणताही अधिकारी त्यांना ऐकत नाहीत. त्यामुळेच प्रशासनात सावळा गोंधळ सुरू असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. आंबोली येथील गेळे प्रश्न देखील भाजपच्याच काळात सुटला होता. परंतु, स्वतः ला श्रेय मिळावं म्हणून आमदार दीपक केसरकर यांनीच जाणून बुजून त्याला उशीर केला असा आरोप देखील त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला आहे

You cannot copy content of this page