राजन तेली; सर्वांचं टॅलेंट घेऊन आगामी निवडणूक लढवणार…
सावंतवाडी ता.११-: आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी कोणाची जरी संभाव्य यादी तयार असली किंवा कोणी बोलत असेल तरी अंतिम उमेदवारांचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, कदाचित कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अशी अफवा पसरवली जात असेल, तसेच कुठल्याही आमच्या वरिष्ठ नेत्यांनी एखाद्या पदाधिकारी ला जबाबदारी देणार असतील असे ते बोलले असतील तर आम्ही सर्वांचे टॅलेंट घेऊन आगामी सर्व निवडणुका लढवू असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
