Headlines

पत्रकारांच्या माध्यमातून विकासासाठी मार्गदर्शन हवे:मनोज रावराणे

कणकवली पं. स. इमारतीतील पत्रकार कक्षाचे उद्घाटन

कणकवली ता.११-:* -कणकवली तालुक्यातील पत्रकारांसाठी पंचायत समितीच्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या पत्रकार कक्षाचे उद्घाटन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, पं. स. सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी सभापती मनोज रावराणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. येत्या काळात पत्रकार कक्षात वाचनालयासह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तालुक्यातील पत्रकारांच्या माध्यमातून यापुढेही तालुक्याच्या विकासासाठी वेळोवेळी मार्गदर्शन सुरूच राहू दे, असे प्रतिपादन कणकवली सभापती मनोज रावराणे यांनी केले. कणकवली पंचायत समितीच्या नवीन इमारतीमधील पत्रकार कक्षाच्या शुभारंभप्रसंगी मनोज रावराणे बोलत होते. तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांनी पं. स. च्या नूतन इमारतीमध्ये पत्रकार कक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल पं. स. च्या विद्यमान तसेच माजी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

यावेळी उपसभापती मिलिंद मेस्त्री, प्रकाश पारकर, गणेश तांबे, भाग्यलक्ष्मी साटम, हर्षदा वाळके, मंगेश सावंत, दिलीप तळेकर, राधिका सावंत, स्मिता मालडीकर, मंगेश सावंत, तृप्ती माळवदे, बीडीओ अरुण चव्हाण, सूर्यकांत वारंग, बापू सावंत,रवी मेस्त्री, श्री. पालकर,सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, उपजिल्हाध्यक्ष रमेश जोगळे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, सुधीर राणे,माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत भावे, भगवान लोके, पत्रकार राजन चव्हाण, तुषार सावंत, नितीन सावंत, दिगंबर वालावलकर, राजेश सरकारे,उमेश बुचडे, स्वप्निल वरवडेकर,विशाल गुरव व तालुका पत्रकार संघाचे सर्व पत्रकार उपस्थित होते.

You cannot copy content of this page