नातेवाईकांनी मृतदेहावर केले अंत्यसंस्कार
कणकवली ता.११-:* फोंडाघाटात खिंडी नजीक इर्टिका कारला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती. आगीत जळलेली कार आरटीओ दप्तरी निलेश विवेकानंद काणेकर यांच्या नावे नोंद असल्याचे स्पष्ट झाले होते.
पोलीस व वागदे ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत एक इसमाचा सांगाडा गाडीत आढळून आला होता.मात्र,कारमधील जळालेली व्यक्ती ही उद्योजक निलेश काणेकर असावी,असा प्राथमिक अंदाज बांधून नातेवाईकांनी रात्री उशिरा अत्यसंस्कार केले.तसेच पोलिसांच्या तपासात निलेश काणेकर यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन कार जळालेल्या ठिकाणी असल्याचे निष्पन्न होत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेत शासकीय रुग्णालयात नेत डीएनएसाठी नमुने घेण्यात आले आहेत. त्याची तपासणी करण्यासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात येणार आहेत.कारचा स्फोट झाला,असा पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे.त्यानुसार कार जळाली त्या ठिकाणी कारमध्ये स्फोट कसा झाला?याची तपासणी पोलिस करणार आहेत. त्यामुळे कारने पेट कोणत्या कारणातून घेतला ? यांचे कारण पुढे येणार आहे.
याप्रकरणी घटनेची फिर्याद सुयोग शरद गावडे रा.वागदे यांनी मालक निलेश काणेकर यांची इर्टीगा कार शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी जळून त्यात ड्रायव्हर सीटवर एक जळक्या स्थितीत मयत दिसून येत आहे,असे म्हटले आहे. घटनास्थळी कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर,उपनिरीक्षक श्री. देठे,मंगेश बावधने व पोलिसांच्या पथकाने पंचनामा केला.जाब जबाब नोंदवण्यात आला,तसेच नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला आहे,त्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
