विद्यामंदिर कणकवली प्रशालेमध्ये विज्ञान दिन साजरा
कणकवली ता.११-:* बदलेल्या जीवनशैलीचे इफेक्ट प्रत्येकाचा आरोग्यावर दिसू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सकस व पोषक आहार सेवन करणे गरजेचे आहे. आपले आरोग्य कसे मेनटेन राहील याकडे प्रत्येक व्यक्तीने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत पुरळकर यांनी केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्यसाधून विद्यामंदिर प्रशालेत ‘आरोग्य धनसंपदा’ या थिमवर आधारित कार्यक्रम आयोजित केला होता.या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुख्याध्यापक भारत सरवदे, पर्यवेक्षक पी.जे.कांबळे, अच्युत वणवे,विज्ञान शिक्षक रश्मी माणगावकर,जे.जे.शेळके, श्रद्धा कदम,संदीप कदम, पृथ्वीराज बर्डे, शर्मिला केळुसकर,राजेंद्र तवटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व समजून सांगितले. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा र्हास केला तर त्यांचे परिणाम सर्वांना भोगावे लागतात. त्यामुळे विकास करताना पर्यावरणाचा र्हास होणार नाही.
याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. विज्ञानाचे जसं फायदे आहेत तसेच तोटे आहेत ,याचे विस्तृत विवेचन प्रास्ताविकेत भूमिका चेचरे या विद्यार्थिनीने केले. आदित्य ध्रुवा तेंडुलकर व अन्य विद्यार्थ्यांनी विज्ञान शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांनी लावलेल्या वैज्ञानिक शोधाचीख माहिती, विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच त्यांनी केलेला अभ्यास व विज्ञान क्षेत्रातील कामाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. निशांत राणे यांनी काही उदाहरणे सांगत विज्ञानाची माहिती दिली.
हरिष प्रभू,किरण सावंत यांनी तिंडाल इफेक्ट्स प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बदलेल्या जीवनशैलीचा आणि चुकीच्या आहार पद्धतीचा अन् व्यसनांचा अवयवांना कशाप्रकारे परिणाम करते याची माहिती नाटिकेद्वारे उपस्थितांना करून दिली. आरंभी आरोग्य धनसंपदा या थीमच्या पाटीचे अनावरण डॉ.पुरळकर यांच्या हस्ते करत सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा मुसळे यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
