Headlines

Global Maharashtra Breaking News

भाजपच्या महिला आघाडी मालवण शहरअध्यक्ष पदी सौ. अन्वेशा आचरेकर

मालवण ता.१८-:* भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या मालवण शहर अध्यक्षपदी सौ. अन्वेशा अजित आचरेकर उर्फ चारुशीला सोनवडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गवंडीवाडा बूथ अध्यक्षपदी दादा कोचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौ. अन्वेशा आचरेकर यांना माजी नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर यांच्या हस्ते तर दादा कोचरेकर यांना माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर…

Read More

बहुजन नायक काशिराम यांच्या जयंतीदिनी सावंतवाडीत अभिवादन…

सावंतवाडी ता.१८-:* बहुजन नायक काशिराम यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे. बहुजनांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर कार्य केले होते. यावेळी प्रा. डॉ. देविदास बोर्डे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव, बामसेफ…

Read More

गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी आरोपीला सशर्त जामीन मंजूर…

सावंतवाडी ता.१८-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी वेताळ बांबर्डे येथे कारवाई करत अटक करण्यात आलेल्या विनोद वर्मा या आरोपीला २ दिवसाच्या पोलिस कोठडी नंतर आरोपीचे वकील अँड परशुराम चव्हाण यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी आरोपी तर्फे अँड परशुराम चव्हाण यांनी न्यायालयात जमीन अर्ज दाखल केला असता आरोपीला १५ हजार रुपयाचा सशर्त…

Read More

प्राथ. आरोग्य केंद्राच्या माध्यमातून उत्तम सेवा मिळावी:संजना सावंत

प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कणकवली ता.१८-:* कणकवली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सिंधुदुर्ग जि. प.अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत ,वैद्यकीय अधिकारी अजित फाटक,डाॅ.नीता बाड,तालुका आरोग्य अधिकारी संजय पोळ ,तालुका आरोग्य सहाय्यक विनोद सावंत,नेत्र चिकित्सक अधिकारी कोरे, आरोग्य…

Read More

स्व. लीलाधर हडकर यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी- भाई गोवेकर

स्मृतीलीला पुरस्काराचे वितरण मालवण ता.१८-: उत्कृष्ट खेळाडू असलेले माजी नगराध्यक्ष स्व. लीलाधर हडकर हे आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी जागवत ठेवण्याचे काम मालवण स्पोर्ट्स असोसिएशन व भंडारी संघाने केले आहे. हडकर यांचे क्रीडा क्षेत्रातील कार्य मोठे असून भावी पिढीने हडकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन काम करावे असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी येथे…

Read More

छापा मारत घोणसरीत हातभट्टी उध्वस्त

दारूसाठीचे रसायन आणि बॅरल केले नष्ट कणकवली ता.१८-: कणकवली तालुक्यातील घोणसरी टेबवाडी येथे नदीलगत हातभट्टीची अनधिकृत दारू काढून त्याची विक्री होत असल्याबद्दल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या नेतृत्वाखाली टाकलेल्या छाप्यात सुमारे 22 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई 17 मार्च रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. मात्र…

Read More

रंगाची उधळण करत दोडामार्ग मध्ये धुलीवंदन उत्साहात साजरी…

दोडामार्ग ता.१८-:* दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात गुरुवारी होळी पौर्णिमेपासून शिमगोत्सव सुरू झाला आहे.गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषणूच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादले गेले होते.त्यामुळे अनेकांना दोन वर्षे शिमगोत्सव आनंदात साजरा करता आला नव्हता .पण या वर्षी कोरोना हद्दपार झाला.शासनाने निर्बंध उठवले त्यामुळे शुक्रवारी दोडामार्ग तालुक्यात अनेक गावात युवक, युवती, महिला, जेष्ठ मंडळी परराज्यातील मंडळी, यांनी ठिकठिकाणी रंगाची…

Read More

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे …

भंडारी ए.सो. हायस्कूलचे मुख्याध्यापक वामन खोत यांचे प्रतिपादन मालवण ता.१८-:* दृष्टी आड झालेल्या सृष्टीचे महत्व मानवाला न समजल्याने तसेच मानवाच्या चंगळवादी आणि विलासी वृत्तीमुळे आज मोठ्या प्रमाणावर जंगलाचे अतोनात नुकसान होत आहे. परिणामी पर्यावरण संतुलन बिघडल्याने त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. आणि म्हणूनच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन भंडारी ए….

Read More

दाणोली येथील साटम महाराजांचा पुण्यतिथी उत्सव रविवारी २० मार्च ला होणार साजरा…

भाविकांनी उत्साहात सहभागी व्हावे… सावंतवाडी ता.१८-: तालुक्यातील दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराजांचा पुण्यतिथी उत्सव रविवारी दिनांक २० मार्च रोजी तुकाराम बीज दिनी साजरा होणार असून, कोरोना नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा होणार असून, भाविकांनी उत्साहात सहभागी होऊन तीर्थ प्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या वतीने…

Read More

शिरवल येथील हायमास्टचे राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याहस्ते उद्घाटन

कणकवली ता.१८-: कणकवली तालुक्यातील कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील शिरवल येथील श्री देव रवळनाथ मंदिर परिसरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांच्या स्वनीधी फंडातून ३ लाख रुपये खर्च करून हायमास्ट विद्युत पुरवठा करण्यात आला यांचे श्रीफळ वाढवून व फित कापून बाळ कनयाळकर यांनी शुभारंभ केला व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी…

Read More
You cannot copy content of this page