भाजपच्या महिला आघाडी मालवण शहरअध्यक्ष पदी सौ. अन्वेशा आचरेकर

मालवण ता.१८-:* भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या मालवण शहर अध्यक्षपदी सौ. अन्वेशा अजित आचरेकर उर्फ चारुशीला सोनवडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गवंडीवाडा बूथ अध्यक्षपदी दादा कोचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सौ. अन्वेशा आचरेकर यांना माजी नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर यांच्या हस्ते तर दादा कोचरेकर यांना माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, गणेश कुशे, आपा लुडबे, ममता वराडकर, पूजा करलकर, भाऊ सामंत, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, युवक शहराध्यक्ष ललित चव्हाण, विलास मुणगेकर, लीलाधर पराडकर, आबा हडकर, मोहन वराडकर, भाऊ मोर्जे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page