Headlines

बहुजन नायक काशिराम यांच्या जयंतीदिनी सावंतवाडीत अभिवादन…

सावंतवाडी ता.१८-:* बहुजन नायक काशिराम यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे. बहुजनांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर कार्य केले होते.

यावेळी प्रा. डॉ. देविदास बोर्डे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव, बामसेफ जिल्हाध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सगुण जाधव, कांता जाधव, अनिकेत जाधव, राजू कदम, अक्षय कारिवडेकर, रुपेश जाधव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page