गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी आरोपीला सशर्त जामीन मंजूर…

सावंतवाडी ता.१८-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी वेताळ बांबर्डे येथे कारवाई करत अटक करण्यात आलेल्या विनोद वर्मा या आरोपीला २ दिवसाच्या पोलिस कोठडी नंतर आरोपीचे वकील अँड परशुराम चव्हाण यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

यावेळी आरोपी तर्फे अँड परशुराम चव्हाण यांनी न्यायालयात जमीन अर्ज दाखल केला असता आरोपीला १५ हजार रुपयाचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page