स्व. लीलाधर हडकर यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी- भाई गोवेकर

स्मृतीलीला पुरस्काराचे वितरण

मालवण ता.१८-: उत्कृष्ट खेळाडू असलेले माजी नगराध्यक्ष स्व. लीलाधर हडकर हे आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी जागवत ठेवण्याचे काम मालवण स्पोर्ट्स असोसिएशन व भंडारी संघाने केले आहे. हडकर यांचे क्रीडा क्षेत्रातील कार्य मोठे असून भावी पिढीने हडकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन काम करावे असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी येथे बोलताना केले.

मालवण तालुका भंडारी संघाच्यावतीने आयोजित आणि हडकर कुटुंबीयांच्या वतीने व सौ. नंदिता राजेश पाटील पुरस्कृत कै. लीलाधर गणेश हडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणाऱ्या स्मृतिलीला पुरस्काराचा वितरण सोहळा व हडकर यांच्या स्मृतिदिना निमित्त मालवण स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आयोजित टेबलटेनिस स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा भरड येथील लीलांजली हॉल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई गोवेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व लीलाधर हडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर भंडारी संघाचे मालवण अध्यक्ष रवी तळाशीलकर, भाई गोवेकर, मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष रामा शेट्ये, भाऊ हडकर, भाई खराडे, भंडारी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील नाईक, विद्याधर झाट्ये आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट व अष्टपैलू व्यक्तित्वास देण्यात येणारा स्मृतिलीला पुरस्कार अशोक कडू (क्रिकेट), बाळा मुणगेकर (व्हॉलीबॉल), रुजाय फर्नांडिस (बॅडमिंटन) यांना प्रदान करण्यात आला.

मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन तिघांनाही सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी मालवण स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या टेबल टेनिस स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी तळाशीलकर यांनी केले. यावेळी अजय शिंदे, भाई खराडे, भाई गोवेकर, नंदन देसाई, शंकर पराडकर, अभिमन्यू धुरी यांनी मनोगते व्यक्त करत लीलाधर हडकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अजय शिंदे यांनी केले. यावेळी श्रीमती अंजली हडकर, विष्णू कोरगावकर, सागर हडकर, चेतन हडकर, यजुवेंद्र हडकर, नंदन देसाई, शंकर पराडकर, सचिन आरोलकर, जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजा देसाई, प्रमोद मोहिते, मंगेश धुरी, विक्रम मोरे, निळकंठ मालंडकर, आपा मालंडकर आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page