रंगाची उधळण करत दोडामार्ग मध्ये धुलीवंदन उत्साहात साजरी…

दोडामार्ग ता.१८-:* दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात गुरुवारी होळी पौर्णिमेपासून शिमगोत्सव सुरू झाला आहे.गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषणूच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादले गेले होते.त्यामुळे अनेकांना दोन वर्षे शिमगोत्सव आनंदात साजरा करता आला नव्हता .पण या वर्षी कोरोना हद्दपार झाला.शासनाने निर्बंध उठवले त्यामुळे शुक्रवारी दोडामार्ग तालुक्यात अनेक गावात युवक, युवती, महिला, जेष्ठ मंडळी परराज्यातील मंडळी, यांनी ठिकठिकाणी रंगाची उधळण करत धुलीवंदन उत्साहात साजरी केली.

काही ठिकाणी डिजे साऊंड सिस्टीम लावून गाण्यावर फेर धरून हा सण साजरा केला.यावेळी विविध प्रकारच्या रंगाची उधळण करण्यात आली.

You cannot copy content of this page