Headlines

Global Maharashtra Breaking News

मधमाशांच्या हल्ल्यात युवक जखमी

मनोहर गडावर गेले होते संवर्धनासाठी सावंतवाडी ता.०३-:* गड संवर्धनासाठी गेलेल्या युवकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने पाच ते सहा जण जखमी झाले ही घटना आज दुपारच्या सुमारास शिरशिंगे येथील मनोहर गडाच्या पायथ्याशी घडली यातील दोघा जखमी युवकांना उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेबाबत येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Read More

मालवणात निराधार योजनेच्या ६९ प्रकरणांना मंजुरी

मालवण ता.०३-:* मालवण तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेची बैठक तालुका अध्यक्ष मंदार केणी व तहसीलदार अजय पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीत ६९ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून ७ व्यक्तींना प्रत्येकी २० हजारांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे दि ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता संजय…

Read More

मालवण काँग्रेस शहर अध्यक्षपदी सतिश आचरेकर यांची नियुक्ती…

मालवण दि प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस मालवण शहर अध्यक्ष पदी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक संघटनेचे सदस्य श्री. सतीश आचरेकर यांच्या निवडीबद्दल सिंधुदुर्ग किल्ला वाहतूक चालक मालक संघटनेच्या वतीने श्री. दिलीप आचरेकर यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत,…

Read More

११ एप्रिल पासून ‘गाबीत चषक २०२२’ क्रिकेट स्पर्धा…

एकेश्वर मित्र मंडळाचे झालझुल मैदानावर आयोजन मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील एकेश्वर मित्र मंडळाच्यावतीने मालवण दांडी येथील झालझुल मैदानावर दिनांक ११ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत ‘गाबीत चषक २०२२’ ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघास ३० हजार रुपये व आकर्षक चषक असून उपविजेत्या संघास १५ हजार रुपये व…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेअंतर्गत सावंतवाडी मतदारसंघासाठी 2 कोटी 11 लक्ष रूपयांचा निधी मंजूर…

रूपेश राऊळ; आम. दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश सावंतवाडी ता.०३-: राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२१/२२ या आर्थिक वर्षासाठी २ कोटी ११ लक्ष रुपयांचा निधी सावंतवाडी – दोडामार्ग- वेंगुर्ला तालुक्यातील विविध ३२ विकास कामांसाठी मंजूर झाले आहेत. यात सावंतवाडी तालुक्यासाठी…

Read More

१३६ वाहन चालकांवर दंडाची कारवाई

मार्च महिन्यात ७८ हजारांचा दंड वसूल;मालवण पोलिसांची कारवाई मालवण ता.०३-:* मालवणात मार्च महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी १३६ वाहनचालकांवर ७८ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. मालवण शहरात ट्रीपल सीट वाहन चालविणे, लायसन्स नसणे, नंबर प्लेट नसणे, नंबर प्लेट तुटलेली असणे, नो पार्किंग एरियात दुचाकी व चारचाकी लावणे, हेल्मेट नसणे, आरसी बूक, पीयूसी…

Read More

आम.नितेश राणे यांनी दिल्या खारेपाटण युवासेना विभागप्रमुख तेजस राऊत यांना शुभेच्छा

कणकवली ता.०३-:* आम.नितेश राणे यांनी खारेपाटण शहराला आचनक भेट देत येथील सामाजिक युवा कार्यकर्ते तसेच खारेपाटण विभाग शिवसेना युवा सेनाप्रमुख तेजस राऊत यांच्या चक्क घरी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जि प सदस्य व खारेपाटण सोसायटीचे चेअरमन रवींद्र जठार,कणकवली प स माजी सभापती दिलीप तळेकर,रवी शेट्ये,भाजपा शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,खारेपाटण उपसरपंच…

Read More

पाताडे मामांच्या कुटुंबियांना मालवण क्रिकेट खेळाडू व क्रिकेटप्रेमींतर्फे मदत सुपूर्द.

मालवण ता.०३-:* मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडचे मुख्य क्युरेटर तथा माळी श्री पांडुरंग पाताडे ऊर्फ पाताडे मामा यांच्या आकस्मिक निधनानंतर पाताडे मामांनी क्रिकेटच्या प्रेमापोटी केलेल्या सेवेची दखल घेऊन मालवण क्रिकेट प्रेमी, खेळाडू यांनी पाताडे मामांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत दिली. मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडचे मुख्य क्युरेटर तथा माळी श्री पांडुरंग पाताडे ऊर्फ पाताडे मामा यांचे नुकतेच निधन…

Read More

मळेवाड हेदुलवाडी सुपुत्र विजय नाईक यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती

मुंबई पोलीस दलात आहेत कार्यरत सावंतवाडी ता.०३-:* सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-हेदुलवाडी गावचे सुपुत्र विजय भास्कर नाईक यांना मुंबई पोलिस विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. नुकतीच मुंबईच्या पोलीस विभागात अधिकाऱ्यांना पदोन्नती जाहिर करण्यात आली. या अधिकाऱ्यामध्ये सावंतवाडीत तालुक्यातील मळेवाड हेदुलवाडी येथील व सद्यस्थितीत मुंबई येथे नोकरीनिमित्त असणारे विजय भास्कर नाईक यांना मुंबई पोलीस विभागात पोलीस…

Read More

एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत व दीक्षा नाईक विजेत्या

श्री देव झाळेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कट्टा भंडारवाडीचे आयोजन कुडाळ ता.०३-: श्री देव झाळेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कट्टा भंडारवाडी (ता देवगड) आयोजित एकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात पिगुळी कुडाळची मृणाल सावंत व लहान गटात दीक्षा नाईक विजेत्या ठरल्या गुढीपाडवा नववर्षाच्या निमित्ताने श्री देव झाळेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कट्टा भंडारवाडीच्या…

Read More
You cannot copy content of this page