एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत व दीक्षा नाईक विजेत्या

श्री देव झाळेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कट्टा भंडारवाडीचे आयोजन

कुडाळ ता.०३-: श्री देव झाळेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कट्टा भंडारवाडी (ता देवगड) आयोजित एकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात पिगुळी कुडाळची मृणाल सावंत व लहान गटात दीक्षा नाईक विजेत्या ठरल्या गुढीपाडवा नववर्षाच्या निमित्ताने श्री देव झाळेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कट्टा भंडारवाडीच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा व एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या एकेरी नृत्य स्पर्धेत खुला गट दुतिय नेहा जाधव तृतीय संजना पवार चौथा सानिका सावंत लहान गट दुतिय दिव्या धामणेकर तृतीय तन्मय आईर उत्तेजनार्थ आरव आईर शर्वरी जायडे सलोनी सावंत यांनी मिळविला स्पर्धेचे परीक्षण सौ अनुजा गांधी व प्रियांका बांधकर यांनी केले विजेत्यांना रोख रक्कम प्रमाणपत्र व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी रवींद्र करगुटकर ग्रामसेवक श्रध्दा वळंजू सुनील करगुटकर संतोष करगुटकर विवेक शेडगे प्रथमेश नार्वेकर मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page