मालवण ता.०३-:* मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडचे मुख्य क्युरेटर तथा माळी श्री पांडुरंग पाताडे ऊर्फ पाताडे मामा यांच्या आकस्मिक निधनानंतर पाताडे मामांनी क्रिकेटच्या प्रेमापोटी केलेल्या सेवेची दखल घेऊन मालवण क्रिकेट प्रेमी, खेळाडू यांनी पाताडे मामांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत दिली.
मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडचे मुख्य क्युरेटर तथा माळी श्री पांडुरंग पाताडे ऊर्फ पाताडे मामा यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यानंतर मालवण क्रिकेट प्रेमी,खेळाडू यांनी पाताडे मामांच्या कुटुंबियांप्रती संवेदना म्हणून एकत्रीत योगदानातून आर्थिक मदत करायचे ठरवले.
ती मदत मामांच्या पत्नी आणि मुलीकडे काल शनिवारी पाताडेमामांच्या वायरी येथील निवासस्थानी जाऊन दिली गेली. यावेळी सर्व खेळाडू व क्रिकेटप्रेमींतर्फे क्रिकेट खेळाडू निखील परब, मंदार गावडे, प्रसाद राणे, गोविंद ऊर्फ बंटी केरकर, सुशील शेडगे , मंदार गावडे सुयोग पंडित, वैभव सावंत उपस्थित होते
