कणकवली ता.०३-:* आम.नितेश राणे यांनी खारेपाटण शहराला आचनक भेट देत येथील सामाजिक युवा कार्यकर्ते तसेच खारेपाटण विभाग शिवसेना युवा सेनाप्रमुख तेजस राऊत यांच्या चक्क घरी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी जि प सदस्य व खारेपाटण सोसायटीचे चेअरमन रवींद्र जठार,कणकवली प स माजी सभापती दिलीप तळेकर,रवी शेट्ये,भाजपा शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम,विजय देसाई,भाऊ राणे,सुधीर कुबल, खारेपाटण ग्रा.प सदस्य शंकर राऊत,राजेंद्र वरूनकर,खारेपाटण व्यापारी असोशिएनचे अध्यक्ष वीरेंद्र चिके,माजी सरपंच किशोर माळवदे,कुरंगावणे उपसरपंच पप्पू ब्रम्हदंडे,बबन तेली राजू राऊत,राजू चव्हाण,बाळू चव्हाण,नितीन चव्हाण,शेखर शिंदे,सौ साधना धुमाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
युवा सेना विभाग प्रमुख तेजस राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथे आलेल्या आमदार नितेश राणे यांचा राऊत कुटुंबियांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मात्र शिवसेनेच्या एका युवा पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाला भाजप आमदार नितेश राणे यांनी खारेपाटण ला जाऊन शुभेच्छा दिल्यामुळे खारेपाटण मध्ये सद्या राजकीय तर्क वितर्काना उत आला असून स्थनिक भाजपा कार्यकर्त्यांकडून मात्र ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट असल्याचे सांगण्यात आले आहे.
