रूपेश राऊळ; आम. दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश
सावंतवाडी ता.०३-: राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२१/२२ या आर्थिक वर्षासाठी २ कोटी ११ लक्ष रुपयांचा निधी सावंतवाडी – दोडामार्ग- वेंगुर्ला तालुक्यातील विविध ३२ विकास कामांसाठी मंजूर झाले आहेत. यात सावंतवाडी तालुक्यासाठी १ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली आहे.
