११ एप्रिल पासून ‘गाबीत चषक २०२२’ क्रिकेट स्पर्धा…

एकेश्वर मित्र मंडळाचे झालझुल मैदानावर आयोजन

मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील एकेश्वर मित्र मंडळाच्यावतीने मालवण दांडी येथील झालझुल मैदानावर दिनांक ११ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत ‘गाबीत चषक २०२२’ ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघास ३० हजार रुपये व आकर्षक चषक असून उपविजेत्या संघास १५ हजार रुपये व आकर्षक चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील मालिकाविर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, फलंदाज व गोलंदाजांनाही वैयक्तिक बक्षिसे आहेत. या स्पर्धेचे स्वरुप एक गांव एक संघ असे असून संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ आयकॉन खेळाडू खेळविण्याची मुभा दिली गेली आहे. या स्पर्धेचे प्रवेश शुल्क चार हजार रुपये असून अधिक माहितीसाठी श्री. रोगे ९८६००२२११६ यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page