वाघेरी सोसायटीत भाजपाचे मनसुबे उधळत 11 जागांवर शिवसेनेचे संचालक विजयी
कणकवली ता.११-:* कणकवली तालुक्यातील वाघेरीमध्ये शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपाचे मनसुबे उधळून लावले आहेत. माजी सभापती मनोज रावराणे व माजी सरपंच संतोष राणे यांनी वाघेरी सोसायटीची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असताना मात्र शिवसेनेचे 11 संचालक विजय होत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीकरिता युवा सेनेचे सिद्धेश राणे यांची मेहनत कामी आली आहे. वाघेरीमध्ये शिवसेना वाढीसाठी सिद्धेश…
