पाण्याच्या टाक्या केल्या स्वच्छ

सहयोग ग्रामविकास मंडळाचा उपक्रम;प्रा एम व्ही कुलकर्णी, माजगाव सरपंच दिनेश सावंत यांनी केले उदघाटन

सावंतवाडी ता.११-: सहयोग ग्रामविकास मंडळाच्यावतीने पाण्याचा टाक्या स्वच्छ करण्याच्या उपक्रमाचे उदघाटन प्राध्यापक एम. व्ही. कुलकर्णी आणि माजगाव सरपंच दिनेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप गोडकर, उपाध्यक्ष अण्णा देसाई, सचिव मोतीराम टोपले, सहसचिव बाळू धुरी, राजेंद्र बिर्जे, शिवाजी आळवे उपस्थित होते. आपण आपल्या इमारतीच्या गच्चीवरील पाण्याची टाकी वर्षातून दोनदा स्वच्छ करणे गरजेचे आहे.

बऱ्याचदा दोन तीन वर्ष स्वच्छ केली जात नसल्याने त्यात शेवाळ, जीवजंतू सेंद्रिय पदार्थ आणि माती जमा होते, अशा पाण्याच्या वापरामुळे जीवाला धोका उद्भभावू शकतो. आपल्याकडे मनुष्यबळ नसल्यामुळे किंवा वेळेअभावी दुर्लक्ष केले जाते, म्हणून आमच्या सहयोग ग्रामविकास मंडळाने सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाची सुरुवात शनिवारपासून करण्यात आली. या उपक्रमात पाण्याच्या टाकीची आतून आणि बाहेरून केमिकल ट्रीटमेंट आणि मशीनने स्वच्छता केली जाणार असल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.

You cannot copy content of this page