कणकवली ता.११-:* कणकवली तालुक्यातील वाघेरीमध्ये शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपाचे मनसुबे उधळून लावले आहेत. माजी सभापती मनोज रावराणे व माजी सरपंच संतोष राणे यांनी वाघेरी सोसायटीची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असताना मात्र शिवसेनेचे 11 संचालक विजय होत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीकरिता युवा सेनेचे सिद्धेश राणे यांची मेहनत कामी आली आहे.
वाघेरीमध्ये शिवसेना वाढीसाठी सिद्धेश राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचे फळ या निवडणुकीच्या निकालातून मतदारांनी दिले आहे. या निवडणुकीत शिवसेनेची विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे – मुरलीधर रमाकांत राणे- 109, अनंत काशिनाथ राणे- 107, मकरंद अशोक राणे- 101, विश्राम परशुराम राणे- 98, श्रीकांत चंद्रकांत राणे- 98, संतोष बाळकृष्ण कदम- 94, सहदेव विश्राम मोंडकर- 94, तुकाराम गुरव – 95, गोपाळ कदम- 102, सुहासिनी राणे- 109, स्नेहलता नेवगे- 94 यांनी यश मिळवले.
सोसायटीवर शिवसेनेने निर्विवाद बाजी मारल्यानंतर शिवसेना नेते सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी सभापती संदेश पटेल, आदींनी भेट देत नवनिर्वाचित संचालकांची अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा उपतालुकाप्रमुख प्रकाश वाघेरकर, विभागप्रमुख बाबू रावराणे, राजू रावराणे, बबन नारकर, संजय पारकर, युवा शाखाप्रमुख अमोल गुरव, शाखाप्रमुख दत्तात्रय राणे, दिनेश राणे, सुनिल राणे, अनिल राणे, मंगेश नेवगे, एकनाथ वाघेरकर, राजेश कदम, किर्तीकुमार पाटील, मुरारी राणे, का.वा. राणे, रविंद्र राणे, गणेश राणे, निलेश भोगले, केदार रेवडेकर, दिलीप कदम, गजानन राणे, उपसरपंच अनुजा राणे, आत्माराम राणे, दत्ता राणे, विनेश राणे, मनोहर कदम, दिनेश पेडणेकर, सिद्धेश मोंडकर, दीपक कदम, एकनाथ राणे, नितीन कदम, संजय कदम, प्रकाश सुतार, रामदास कदम, नामदेव तावडे, महेश मोंडकर आदी शिवसेना महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
