देवगड ता.१०-:* देवगड तालुका औधो. बहुउद्देशीय ग्रामीण सह. संस्था, मर्या. देवगड व अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १०एप्रिल २०२२ रोजी स.११ते २ या वेळात बर्वे लायब्ररी स्नेहसंवर्धक हॉल देवगड याठिकाणी संपन्न झाले. या आरोग्य शिबिराचे उदघाटन राजेंद्र मसुरकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.
या वेळी बहुद्देशीय ग्रामीण सह.संस्था अध्यक्ष उल्हास मणचेकर,काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुरेश देवगडकर,शहर अध्यक्ष उमेश कुळकर्णी, शिवप्रसाद पेडणेकर,विनायक म्हापसेकर,अथायु हॉस्पिटल कोल्हापूर मूत्रविकार तज्ञ डॉराहुल चौगुले,हृद्यरोगतज्ञ डॉ,ओंकार दळवी,मदन गोरे,अभय सुतार,अन्य सहकारी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना राजेंद्र मसुरकर डॉ राहुल चौगुले यांनी मार्गदर्शन करून शासनाच्या आरोग्य विषयी योजना ,आजार,उपचार ,शस्त्रक्रिया या विषयी सविस्तर माहिती दिली.या शिबिराचा १०६ रुग्णांनी लाभ घेतला. ७ रुग्णांवर ऍन्जिओग्राफी करण्यात येणार आहे. मुतखड्याचा ऑपरेशन ४ रुग्णावर करण्यात येणार आहे. हाडांचे फॅक्चर ३ रुग्ण आहेत. अर्थरोस्कॉपी द्वारे गुडघ्याचे लिगामेंट १ रुग्णाची करण्यात येणार आहे. प्रोस्टेट ९ रुग्ण या सर्व रुग्णांना अथायु हॉस्पिटल ची गाडी ने मोफत कोल्हापूर येथे नेऊन शस्त्रक्रिया करून परत आणून सोडण्यात येणार आहे.
