सावंतवाडी ता.१०-:* येथील शहरातील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या सन २०२० च्या पुरस्कारांचे आज मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले येथील श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी अध्यक्षस्थानी सागर चव्हाण, प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री प्रवीण भोसले, सावंतवाडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे, सेवानिवृत्त पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.आर.परब, केंद्रप्रमुख म.ल.देसाई, सावंतवाडीचे माजी नगरसेवक उमाकांत वारंग, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी व अध्यापक विद्यालय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे, ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे संस्थापक वाय.पी.नाईक, अध्यक्ष जावेद शेख, कार्याध्यक्ष निलेश पारकर कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक एस आर मांगले, एस.जी.साळगावकर, प्रदीप सावंत, कवी विठ्ठल कदम, आर आर.व्ही.नारकर, एन.पी.मानकर मुख्याध्यापक, कळसुलकर, एस.पी.कुळकर्णी, अनिल कांबळे, बी.बी.चव्हाण, व्ही.टी.देवण, सलीम तकीलदार, डॉ.कविता पराडकर, डॉ.निकिता सुर्याजी, सौ.नजमा खान, वैभव केंकरे, सुनील नेवगी, गजानन नानचे, पांडुरंग काकतकर आदी उपस्थित होते.
