रामनवमी उत्सवानिमित्त मंदिरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
कणकवली ता.१०-:* कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या परिसरातील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात रविवारी भावपूर्ण वातावरणात श्री रामजन्म सोहळा पार पडला. राम नामाच्या जयघोषामुळे येथील वातावरण भक्तिमय झाले होते.मंदिर परिसरात विद्युत रोषणाई तसेच मंदिरात रामजन्मा निमित्त ब्रह्मवृदाच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले होते.
श्री राम नवमी उत्सवाच्या निमित्ताने शनिवार पासूनच काशी विश्वेश्वर मंदिरात परिसरात भाविकांची लगबग सुरु होती.दररोज रात्री पालखी सोहळा पार पडला.तसेच श्री राम जन्माची तयारी करण्यात आली होती. दरवर्षी प्रमाणेच रविवारी सकाळी श्री काशिविश्वेश्वर मंदिरात काही धार्मिक विधि पार पडले. त्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कीर्तनाला प्रारंभ झाला. श्रीरामाची महती वर्णन करत कीर्तनकारानी राम जन्माची कथा सांगितली. दुपारी १२ वाजता कीर्तनाच्या माध्यमातून राम जन्म झाला.
त्यानंतर श्रीरामाच्या बाल मूर्तिला पाळण्यात घालुन झोके देत पारंपारिक पाळणे गितेही म्हणण्यात आली. त्यानंतर भाविकांनी श्रीराम मुर्तीचे दर्शन घेतले. तसेच त्यांना प्रसाद वाटप करण्यात आले.तदपूर्वी मंदिर परिसरात पालखी फिरवण्यात आली.
हा श्रीराम जन्माचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी भाविकानी गर्दी केली होती. या रामजन्म सोहळ्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सायंकाळी दशावतारी प्रयोग तसेच रात्र दैनंदिन आरती आदी कार्यक्रम होणार आहेत.यावेळी काशीविश्वेश्वर संस्थानचे अध्यक्ष प्रवीण पारकर, भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत,आबा उचले,बंडू हर्णे,प्रसाद बांबुळकर,काशीनाथ कसालकर,शशिकांत कसालकर,दादा नार्वेकर,प्रसाद अंधारी,बाळा सापळे,नागेश मुसळे,चेतन अंधारी, राजू वाळके,भरत उबाळे,हर्षल अंधारी,विकास काणेकर,अमोल कामत,प्रद्युम मुंज,महेश अंधारी,बंडू पारकर आदी मानकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.
