आंबोली शिवसेना विभागाची बैठक संपन्न

संघटनात्मक व विकास कामांवर चर्चा

सावंतवाडी ता.१०-:* आंबोली शिवसेना विभागाची बैठक आज रोजी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ उपतालुकाप्रमुख राघोजी सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये संघटनात्मक व विकास कामांवर चर्चा झाली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पदभार देण्यात आला.

उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना संघटना बांधणी भर देण्याची सूचना केली. यावेळी उपतालुका संघटक उत्तम पारधी, विभाग प्रमुख बबन गावडे, उपविभाग प्रमुख विलास गावडे, विभागीय संघटक तुकाराम गावडे, माजी पंचायत समिती सदस्य मोहन चव्हाण, चौकुळ शाखाप्रमुख रुपेश गावडे, युवासेना उपतालुका प्रमुख सरपंच विनायक सावंत, अजित नार्वेकर, मायकल डिसूजा, अरुण गावडे, अभिजीत मेस्त्री, संतोष पाताडे, विशाल बांदेकर, आनंद गावडे, वैष्णवी गावडे, स्वप्निता करपे आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते

You cannot copy content of this page