Headlines

Global Maharashtra Breaking News

चार दिवसात त्या दोषींवर कारवाई न केल्यास 24 एप्रिल ला पूर्वकल्पना न देता करणार आत्मदहन…

मनसे उपतालुकाध्यक्ष उदय गावडे यांचा इशारा मालवण ता.१९-:* साळेल येथे अस्तित्वात नसलेली शेततळी दाखवून लाखो रुपयांची रक्कम संगनमताने हडप केल्याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी पाच वर्षे तक्रार अर्ज करून आणि दोन वेळा उपोषण करून तसेच कोकण आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचे निर्देश देऊनही आजपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने येत्या चार दिवसात याप्रकरणी…

Read More

सुहास मालवणकर यांचे निधन

मालवण ता.१९-:* मालवण भरड येथील रहिवासी सुहास धोंडी मालवणकर (वय ७२) यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परीवार आहे. समीर व स्वरूपानंद उर्फ नंदू मालवणकर यांचे ते वडील होत.

Read More

तारकर्ली येथील श्री साई मंदिराच्या 12 व्या वर्धापनदिनाचे 26 ते 28 एप्रिल रोजी आयोजन…

मालवण दि प्रतिनिधी तारकर्ली ग्राम श्री साई मंडळ मुंबई रजि यांच्या वतीने श्री साई मंदिराचा बारावा वर्धापन दिन सोहळा दिनांक २६ एप्रिल ते २८ एप्रिल या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवास श्री साईंची पालखी, श्री साई भंडारा श्री साई भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. तारकर्ली येथील श्री साई मंदिराच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम…

Read More

राज्य थाई बॉक्सिंग राज्य पंच पदी अ‍ॅड. विवेक राणे यांची निवड

सिंधुदुर्गनगरी ता१९ पुणे येथे झालेल्या थाई बॉक्सिंग पंच परीक्षेमध्ये अ‍ॅड. विवेक राणे यांची महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग राज्य पंच पदी निवड झाली आहे. ९ जुन ते १२ जुन २०२२ मध्ये दुबई येथे आंतरराष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत देशातील प्रत्येक राज्य सहभागी होणार आहे. स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य संघाचे प्रशिक्षक म्हणुन अ‍ॅड. विवेक राणे…

Read More

स्काऊट गाईड, कब बुलबुल चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

ओरोस ता.१९-:स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा २२ फेब्रुवारी हा जन्म दिवस संपूर्ण जगभरात चिंतन दिन म्हणून साजरा केला जातो. या जयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील पहिले ते चौथीसाठी व पाचवी ते सातवी मुलांकरिता तालुका व जिल्हास्तरावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा…

Read More

दाडाचे टेंब येथील गटाराचे काम निकृष्ट

नगरपरिषद विरोधात १ मे रोजी उपोषण करणार;निलेश वराडकर यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी ता १९ वेंगुर्ले शहरातील दाडाचे टेंब येथील गटार बांधणे हे काम निकृष्ठ होत असल्याच्या तक्रारीची दखल वेंगुर्ला नगरपंचायत घेत नसल्याने या कामाची पहाणी करावी अन्यथा १ मे रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडले जाईल .असा इशारा निलेश वराडकर यांनी जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनातून दिला…

Read More

सुकळवाड हनुमान मंदिरातील जुनी मूर्ती उदय रोगे यांच्या संग्राहलयात देणार

मंदिर ट्रस्टचा निर्णय;नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घेतला निर्णय मालवण (प्रतिनिधी) सुकळवाड येथील हनुमान मंदिरातील हनुमानाच्या जुन्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आल्यानंतर जुन्या मूर्तीचे जतन करण्यासाठी मूर्ती मालवण येथील संग्रहकार उदय रोगे यांच्या शिवमुद्रा संग्रहालयालात ठेवण्याचा निर्णय हनुमान मंदिर ट्रस्टने घेतला आहे. सुकळवाड येथून मालवण बंदर जेटी पर्यंत हनुमान मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढून समुद्रात…

Read More

तोंडवळी वरचीवाडी जी प शाळेत शाळापूर्व तयारी

मेळाव्याचे उपसरपंच दशरथ वायंगणकर यांनी केले उदघाटन मालवण ता.१९-:*इयत्ता पहिलीत येणारी मुले आनंदी वातावरणात शाळेत या वीत तसेच कोरोना काळात अंगणवाडी शाळेत जावू न शकल्याने त्यांना अवगत नसलेल्या कौशल्यांचा शोध घेवून त्यांना मार्गदर्शन करता यावे या हेतूने तोंडवळी वरचीवाडी येथील जि. प. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या शाळापूर्व तयारी मेळाव्याचे उपसरपंच श्री . दशरथ वायंगणकर यांच्या…

Read More

पर्यटन वाढीसाठी जिल्ह्यात दिशादर्शक फलक लावावेत…

जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाची महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे मागणी… मालवण ता.१९-:राज्य आणि केंद्र सरकारने पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता दिलेल्या आणि केंद्र सरकारने तर पर्यटन वाढीसाठी दत्तक घेतलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यालाला दरवर्षी दहा लाखांहून अधिक देशी विदेशी पर्यटक भेट देतात. यातील बहुतांश पर्यटकांना दिशादर्शक फलक नसल्याने अपरिचित पर्यटन स्थळांना भेट देता येत नाही त्यामुळे पर्यटन वाढीसाठी जिल्ह्यात दिशादर्शक…

Read More

पंचम खेमराजच्या १९८२ च्या बॅचच्या बीएससी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन…

निधन झालेल्या शिक्षक व मित्रांना वाहिली श्रद्धांजली सावंतवाडी ता.१९-:* श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील बीएससी 1982 बॅचच्या विद्यार्थ्याचे स्नेहसंमेलन आज महाविद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये उत्साहात पार पडला यावेळी आपल्यात नसलेल्या काही शिक्षक व 1982 च्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी माजी प्राचार्य डॉ. द. रा. कळसुळकर, प्रा.एम . व्ही. कुलकर्णी, प्रा.व्ही एन्. फातर्फेकर, प्रा. एन्. पी…

Read More
You cannot copy content of this page