स्काऊट गाईड, कब बुलबुल चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

ओरोस ता.१९-:स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा २२ फेब्रुवारी हा जन्म दिवस संपूर्ण जगभरात चिंतन दिन म्हणून साजरा केला जातो. या जयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील पहिले ते चौथीसाठी व पाचवी ते सातवी मुलांकरिता तालुका व जिल्हास्तरावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. जिल्हास्तर स्पर्धेत कब-बुलबुल स्पर्धेत हर्षदा गणेश मेस्त्री-शाळा पाट गजानन आणि स्काऊट गाईड गटात यश मधुकर शिंदे-वाडोस नंबर १ यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.

You cannot copy content of this page