राज्य थाई बॉक्सिंग राज्य पंच पदी अ‍ॅड. विवेक राणे यांची निवड

सिंधुदुर्गनगरी ता१९ पुणे येथे झालेल्या थाई बॉक्सिंग पंच परीक्षेमध्ये अ‍ॅड. विवेक राणे यांची महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग राज्य पंच पदी निवड झाली आहे. ९ जुन ते १२ जुन २०२२ मध्ये दुबई येथे आंतरराष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत देशातील प्रत्येक राज्य सहभागी होणार आहे. स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य संघाचे प्रशिक्षक म्हणुन अ‍ॅड. विवेक राणे यांची निवड करण्यात आली आहे.

अ‍ॅड. विवेक राणे हे छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असून ५८ महाराष्ट्र बटालियन एन्. सी.सी सिंधुदुर्ग अंतर्गत महाविद्यालयाचे केअर टेकिंग ऑफिसर म्हणुन कार्यरत आहेत. थाई बॉक्सिंग हा शालेय खेळ असून एक उत्कृष्ट मार्शल आर्टस् प्रकार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचा सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनचा मानस आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला योग्य ते सहकार्य केले जाईल. तसेच येणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रत्येक शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग आसोसिएशन चे राज्य पंच अ‍ॅड. विवेक राणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page