मालवण दि प्रतिनिधी तारकर्ली ग्राम श्री साई मंडळ मुंबई रजि यांच्या वतीने श्री साई मंदिराचा बारावा वर्धापन दिन सोहळा दिनांक २६ एप्रिल ते २८ एप्रिल या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवास श्री साईंची पालखी, श्री साई भंडारा श्री साई भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. तारकर्ली येथील श्री साई मंदिराच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.
२६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता श्री साई पादुकांवर अभिषेक, संध्याकाळी ४ वाजता श्री साईची गावातून पालखी मिरवणूक, रात्री ७:३० वाजता दर्यावर्ती कला क्रीडा मंडळ तारकर्ली यांचे भजन, रात्री ८:३० वाजता नितीन पाटकर यांचे कीर्तन. २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता श्री साई पादुकांवर अभिषेक, सकाळी ९ वाजता सत्यनारायणाची पूजा, दुपारी १२:३० वाजता साईभंडारा महाप्रसाद, रात्री ८ वाजता झुंजर नाट्यमंडळ तारकर्ली यांचे भजन, रात्री १० वाजता श्री साई गीतांचा संगीतमय नजराणा. २८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता श्री साई पादुकांवर अभिषेक, संध्याकाळी ४ वाजता श्री महापुरुष महिला भजन मंडळ यांचे भजन, संध्याकाळी ६:३० वाजता नवकलाकार भजन मंडळ तारकर्ली यांचे भजन, रात्री ७:३० वाजता श्री ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ पिरखोली यांचे भजन रात्री १० वाजता तारकर्ली गावातील स्पर्धकांसाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धा यामध्ये लहान गट १ ली ते ७ वी तर दुसरा गट खुली स्पर्धा ठेवण्यात आली आहे. तरी भाविक भक्तांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन तारकर्ली ग्राम श्री साई मंडळ मुंबई यांनी केले आहे.
