दाडाचे टेंब येथील गटाराचे काम निकृष्ट

नगरपरिषद विरोधात १ मे रोजी उपोषण करणार;निलेश वराडकर यांचा इशारा

सिंधुदुर्गनगरी ता १९ वेंगुर्ले शहरातील दाडाचे टेंब येथील गटार बांधणे हे काम निकृष्ठ होत असल्याच्या तक्रारीची दखल वेंगुर्ला नगरपंचायत घेत नसल्याने या कामाची पहाणी करावी अन्यथा १ मे रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडले जाईल .असा इशारा निलेश वराडकर यांनी जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

वेंगुर्ले नगरपरिषदे मार्फत कॅम्प पॉवर हाऊस भागात दाडाचे टेंब ते अजित देसाई यांचे घरापर्यंत होणारे गटार बांधणे व क्रॉक्रीटी करणाने तो गटार बंद करणे हे काम सुरु आहे. हे काम दर्जेदार होत नसल्याबाबत तक्रार आहे .शासनाच्या निधीचे काम सुयोग्य पद्धतीने व्हावे यासाठी ते तात्काळ थांबवून आपल्या स्तरावरून या कामाची प्रत्यक्ष पहाणी व पडताळणी व्हावी तसेच माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती तात्काळ देण्याच्या सुचना न.प. मुख्याधिकारी याना देण्यात याव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच हि पडताळणी २५ एप्रिलपर्यंत न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यायासाठी १ मे या महाराष्ट्र दिनी उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे . वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील कॅम्प पॉवर हाऊस नजीकच्या दाडाचे टेंब ते अजित देसाई यांचे घरापर्यंत गटाराचे बांधकाम करणेसाठी ६५ लाख रूपयांच्या कामास मंजूरी मिळाल्यानंतर ज्या ठेकेदारास हे काम करण्यासाठी देण्यात आले . त्या ठेकेदाराने सुरुवातीस या कामाचे बांधकाम निकृष्ट प्रतीच्या जांभेथर दगडाने केले . त्यामुळे त्या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी ते काम रोखून न.प.कडे सिमेट क्राँकीटच्या बांधकामाची मागणी केली .

त्यानंतर केलेले क्रॉकीटचे बांधकाम सुद्धा निकृष्ठ प्रतीचे होऊ लागले . त्या कामासाठी सिमेंटचा वापर कमी होत असल्याचे खाजगी बांधकाम इंजिनीयर मार्फत ग्रामस्थांनी केलेल्या पहाणीत आढळून आले . त्या संदर्भात न.प.कडे माहिती अधिकारात कामाची लांबी , रूंदी , उंची तसेच क्रॉकीट स्लॅबची जाडी व त्यात वापरण्यात येणारे स्टील यासंदर्भात माहिती मागितलेली असताना ती देण्यास सातत्याने टाळाटाळ होत आहे . गतवर्षीच्या पावसाळ्यात अजित देसाई यांच्या घरालगत केलेले गटाराचे काम पावसाळी पाण्याच्या निचऱ्यावेळी निकृष्ट काम झाल्याने ते वाहून गेलेले आहे . सदरचे काम करताना नगरपरिषदेचे इंजिनीयर या कामावर लक्ष देत नाहीत . कामाच्या स्थळी से फिरकलेले नाहीत आणि नगरपरिषदेस त्यांना विचारण्यासाठी गेलेले असताना ते साईटवर गेल्याचे सांगण्यात येते

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या कामाबाबत तक्रार केली . त्यावेळी त्यांनी इंजिनिअर कामावर येऊन पहाणी करतील. असे सांगितले मात्र अजून पर्यंत इंजिनियर काम चालू असताना त्या ठिकाणी येते नाहीत व निकृष्ठ कामाबाबतची पडताळणी करून संबंधित ठेकेदाराला सुचनाही देत नाहीत . आता तर सदरच्या गटारावर ते बंदिस्त करण्यासाठी क्रॉक्रीटीकरणचे काम सुरू करण्यात आले आहे . ते सुद्धा निकृष्ठ प्रतिचे म्हणजे सिमेंटचा वापर कमी होत असल्याने वर्षभरात पडून संपूर्ण कामाचा निधी वाया जाण्याची शक्यता आहे . त्यामुळे सदरच्या कामाचा उपयोग नागरीकांना न होता उलट वाहणे व पादचारी नागरीकांना या निकृष्ठ कामामुळे अपघात होण्याची शक्यता आहे . तरी याबाबत २५ एप्रिल पर्यंत न्याय मिळावा. अन्यथा १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसुन न्याय मिळवावा लागले .असे निलेश वराडकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page