पर्यटन वाढीसाठी जिल्ह्यात दिशादर्शक फलक लावावेत…

जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाची महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे मागणी…

मालवण ता.१९-:राज्य आणि केंद्र सरकारने पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता दिलेल्या आणि केंद्र सरकारने तर पर्यटन वाढीसाठी दत्तक घेतलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यालाला दरवर्षी दहा लाखांहून अधिक देशी विदेशी पर्यटक भेट देतात. यातील बहुतांश पर्यटकांना दिशादर्शक फलक नसल्याने अपरिचित पर्यटन स्थळांना भेट देता येत नाही त्यामुळे पर्यटन वाढीसाठी जिल्ह्यात दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने केल्यानंतर त्याला महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली आहे. सिंधुदूर्ग जिल्हा हा राज्य व केंद्र सरकारने पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता दिली असून केंद्र सरकारच्या पर्यटन वाढीसाठी दत्तक घेतलेल्या जिल्ह्यात देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश झाला आहे.

दरवर्षी १० लाखापेक्षा जास्त देश विदेशी पर्यटक या जिल्ह्यात पर्यटनासाठी येतात प्रामुख्याने येणाऱ्या पर्यटकांचा ओढा सागरी पर्यंटनासाठी असतो सागरी पर्यटना बरोबर या जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यातील हिस्ट्री , कल्चर, एग्रो, मेडिकल, ऍडव्हेंचर तसेच बीच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या पर्यटकाला पर्यटन स्थळी जाण्यासाठी तसेच रस्त्याच्या ठिकाणी दोन तीन रस्ते असतील तर अशा ठिकाणी बोर्ड लावणेसाठी पर्यटन व्यवसायिक महासंघाकडून, पर्यटन संचनालय महाराष्ट्र कडे केलेल्या मागणीस मान्यता मिळाली हा सर्व खर्च सरकारच्या माध्यमातून होणार आहे या विषयी जिल्ह्यातील सर्व व्यापारी ,पर्यटन व्यावसायिक तसेच व्यापार वाढीसाठी काम करणाऱ्या संस्था यांनी आपल्या भागातील दिशादर्शक बोर्डाचे योग्य ठिकाण सुचवा जेणेकरून पर्यटकांना त्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी नियोजित प्रकारे जाता येईल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची दिशा दर्शक फलकाचे ठिकाण सुचवण्यात यावे पर्यटन स्थळाचे नाव, रस्त्याचे नाव, ज्या ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावायचे आहे त्या ठिकाणचे नाव, साधारणता तिथून किती किलोमीटर अंतर अशी माहिती देण्याचे पर्यटन व्यवसायिक महासंघ, सिंधुदुर्ग मार्फत आवाहन करण्यात येत आहे. अश्या प्रकारे बोर्ड लावण्यासाठी आपल्या कडे जी काही ठिकाणे असतील त्याची विस्तृत माहिती किशोर दाभोलकर, सोशल मिडिया प्रमुख, यांचे मोबाईल नंबर ९४०४३४७१९९ वर पाठवावी असे आवाहन श्री विष्णू तथा बाबा मोंडकर यांनी केले

You cannot copy content of this page