तोंडवळी वरचीवाडी जी प शाळेत शाळापूर्व तयारी

मेळाव्याचे उपसरपंच दशरथ वायंगणकर यांनी केले उदघाटन

मालवण ता.१९-:*इयत्ता पहिलीत येणारी मुले आनंदी वातावरणात शाळेत या वीत तसेच कोरोना काळात अंगणवाडी शाळेत जावू न शकल्याने त्यांना अवगत नसलेल्या कौशल्यांचा शोध घेवून त्यांना मार्गदर्शन करता यावे या हेतूने तोंडवळी वरचीवाडी येथील जि. प. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या शाळापूर्व तयारी मेळाव्याचे उपसरपंच श्री . दशरथ वायंगणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या मेळाव्याच्यनिमिताने मुलांची मोटरसायकल वरून मिरवणूक काढण्यात आली.सेल्फी पाॕईंट तयार करण्यात आला. विविध स्टाॕल मांडून खेळांच्या माध्यमातून क्षमता आजमावून मुलांना स्वयंसेवकांच्या मदतीने मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्यास तोंडवळी सरपंच तुकाराम कांदळकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या मेळाव्यास पालक,अंगणवाडी सेविका , शिक्षक उपस्थित होते. मेळावा यशस्वी होण्यासाठी श्रीम.शितल माडये , राजेश भिरवंडेकर परशुराम गुरव अशोक डोंगळे यांनी अथक मेहनत घेतली

You cannot copy content of this page