पंचम खेमराजच्या १९८२ च्या बॅचच्या बीएससी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन…

निधन झालेल्या शिक्षक व मित्रांना वाहिली श्रद्धांजली

सावंतवाडी ता.१९-:* श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील बीएससी 1982 बॅचच्या विद्यार्थ्याचे स्नेहसंमेलन आज महाविद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये उत्साहात पार पडला यावेळी आपल्यात नसलेल्या काही शिक्षक व 1982 च्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या वेळी माजी प्राचार्य डॉ. द. रा. कळसुळकर, प्रा.एम . व्ही. कुलकर्णी, प्रा.व्ही एन्. फातर्फेकर, प्रा. एन्. पी ढोरे, प्रा.व्ही. व्ही. जोशी, प्राचार्य डॉ डी एल भारमल सह मोठ्या संख्येने 1982 बॅच चे विद्यार्थी उपस्थित होते

ह्या स्नेहसंमेलनाच्या सुरुवातील कै. आरानके, गुमास्ते, नारखेडे, खानविलकर, आर एस.कुलकर्णी, एल पी पाटील, 1982 बॅच चे कै. नेरुरकर, शेट्टी ,बेकनलकर, गोवेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आली यानंतर 1982 बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली यावेळी काहींनी आपल्या भावना व्यक्त करत आपल्या सरांविषयी, कॉलेज विषयी आदर आणि प्रेम व्यक्त केले कॉलेजने केलेल्या प्रगतीची माजी विद्यार्थ्यांनी मनभरून प्रशंसा केली त्यानंतर शॉल, श्रीफळ, सुपारीचे रोप, आणि कॉलेज, मोतीतलाव आणि राजवाडा असा एकत्रित फोटो फ्रेम भेट देऊन गुरुजनांचा सत्कार करण्यात आला तसेच तशाच प्रकारची फोटोफ्रेम सर्व 1982 बॅच च्या मित्रांना भेट म्हणून देण्यात आली दुपारी जेवणानंतर च्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम करून भविष्यातील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राध्यापक दिलीप गोडकर आर एस केरकर, बाळकृष्ण राणे यांनी केले

You cannot copy content of this page