वेंगुर्ला ता.१९-:* एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचा-यांनी संप पुकारला होता. दरम्यान, वेंगुर्ला एसटी आगारात १८ एप्रिल रोजी ४३ चालक, ४५ वाहक, ५७ चालक तथा वाहक, ८ प्रशासकीय कर्मचारी आणि २३ यांत्रिकी कर्मचारी असे मिळून १७६ कर्मचारी हजर झाले आहेत.
सध्या वेंगुर्ला आगारातून पहाटे ५ वा. आजरा मार्गे कोल्हापूर, दु. २ वा. गगनबावडा मार्गे कोल्हापूर, दु. १ वा. वेंगुर्ला दाभोली कुडाळ, दु. ३.३० वा. तुळसमार्गे सावंतवाडी, सायं.६.२० वा. तुळसमार्गे सावंतवाडी-बांदा मुक्काम आदी फे-या सुरु केल्या असल्याची माहिती वेंगुर्ला आगाराचे स्थानकप्रमुख निलेश वारंग यांनी दिली.
