Headlines

Global Maharashtra Breaking News

श्री देव विठ्ठल मंदिर येथील वीणा सप्ताहास 1 जुलै पासून होणार प्रारंभ . . .

⚡सावंतवाडी ता.१९-: श्री देव विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथील वीणा सप्ताह ०१जुलैपासून प्रारंभ होणार आहे. सदर वीणा सप्ताहच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी बुधवार २२ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री देव विठ्ठल मंदिराच्या सभागृहात सभा आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व विठ्ठल भक्तांनी व नागरिकांनी सभेस उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

लिसा डायस हिचा निरवडे येथील महापुरुष कला क्रीडा मंडळाच्यावतीने सत्कार

९३ टक्के गुण मिळवून प्रशालेतून प्रथम ⚡सावंतवाडी ता.१९-: : शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२ मध्ये निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलच्या लिसा मनवेल डायस या विद्यार्थीनिने ९३ टक्के गुण मिळवून प्रशालेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे निरवडे सरपंच तथा महापुरुष कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष हरी वारंग व मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ…

Read More

शहरात धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्या…

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.१८-: शहरात राजरोसपणे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, घरफोटी आणि दुकानफोडी करणाऱ्या चोरट्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्याकडे केली आहे. शहरात गेले तीन दिवस चोरीचं सत्र सुरूच आहे याबाबत आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक…

Read More

कोंकण शिक्षक मतदार संघाचे आम. बाळाराम पाटील 20 जूनपासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

⚡कणकवली ता.१८-: कोंकण शिक्षक मतदार संघाचे आम. बाळाराम पाटील हे 20 ते 22 जून या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून शिक्षक संवाद दौरा करणार आहेत. आम. बाळाराम पाटील यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेदोडामार्ग तालुका , सोमवार २०/६/२०२२ – वेळ दुपारी ३-३० वा.दोडामार्ग हायस्कूल.सावंतवाडी तालुका सोमवार २०/६/२०२२,वेळ ५-०० वा. R P D हायस्कूल सावंतवाडी.तालुका देवगड व…

Read More

खवणे समुद्रकिनाऱ्यावर आढळला पुरुष जातीचा मृतदेह

निवती पोलीस ठाण्यात नोंद वेंगुर्ला प्रतिनिधीवेंगुर्ले तालुक्यातील खवणे समुद्रकिनाऱ्यावर खडकाळ भागात एक पुरुष जातीचा सुमारे 45 वयाचा बेवारस मृतदेह आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आढळला आहे. याबाबत निवती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.आज सकाळी किनाऱ्यालगत खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तिंच्या तो निदर्शनास आला. त्यानंतर खवणे खोतवाडी येथील रहिवासी तथा म्हापण ग्रामपंचायत सदस्य संदीप खोत यांनी…

Read More

कोकण पर्यटन विकास महामंडळ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संदेश पारकर यांचा सत्कार

पर्यटनाच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्याच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल असे दिले आश्वासन ⚡वैभववाडी ता.१८संजय शेळके-: महाराष्ट्र शासनाच्या कोकण पर्यटन विकास महामंडळ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना नेते संदेश पारकर यांचा शिवसेना वैभववाडी तालुक्याच्या वतीने शिवसेना शाखेत सत्कार करण्यात आला. पर्यटनाच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्याच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन यावेळी संदेश पारकर यांनी दिले. वैभववाडी तालुक्यातील शिवसेना…

Read More

राष्ट्रवादीतर्फे कणकवली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा अनंत पिळणकर यांच्याहस्ते सत्कार

⚡कणकवली ता.१८-: राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेंद्र हुलावळे यांच्यासह बढती मिळालेले पीएसआय विनायक चव्हाण, बापू खरात यांचा सत्कार करण्यात आला. कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून हुलावले योग्य जबाबदारी पार पाडत आहेत. कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या विनायक चव्हाण आणि बापू खरात यांना नुकतीच पीएसआय पदी बढती मिळाली आहे.यानिमित्त…

Read More

शेती अवजारांची देखभाल व दुरुस्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.१८-: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि गुरुकृपा कृषी सेवा केंद्र, वराड (ता. मालवण ) यांच्या संयुक्त विद्यमाने शेती अवजारांची देखभाल व दुरुस्ती या विषयीचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रशिक्षणात कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी व कृषी अधिकारी दिनेश लंबे यांनी कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेचा…

Read More

मंगेश लोकेनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी अभिमानास्पद

मुंबई पोलीस विभागातील निवृत्त अधिकारी ए.सी.पी. प्रभाकर लोके यांचे प्रतिपादन ⚡वैभववाडी ता.१८ संजय शेळके-: खांबाळे गावातील प्रशालेतील विद्यार्थ्यांना मंगेश लोकेनी गेली 25 वर्षे स्व:खर्चाने शैक्षणिक साहित्याचे केलेले वाटप खरंच कौतुकास्पद आहे. अशा प्रकारचे सहकार्य करून त्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांनी यामधून आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत व या शाळेचे पालकांचे शिक्षकांचे नाव…

Read More

वाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच विनायक घाडी स्वगृही

भाजपमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने पुन्हा शिवसेनेत ⚡देवगड ता.१८-: तालुक्यातील वाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच विनायक घाडी यांनी काही दिवसांपूर्वी विकासाच्या मुद्द्यावर भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला होता. परंतु दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने ते पुन्हा शिवसेनेत स्वगृही नगरसेवक निवृत्ती (बुवा)तारी यांच्या उपस्थितीत परतले . या वेळी त्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले यावेळी बांधकाम सभापती…

Read More
You cannot copy content of this page