९३ टक्के गुण मिळवून प्रशालेतून प्रथम
⚡सावंतवाडी ता.१९-: : शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२ मध्ये निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलच्या लिसा मनवेल डायस या विद्यार्थीनिने ९३ टक्के गुण मिळवून प्रशालेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे निरवडे सरपंच तथा महापुरुष कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष हरी वारंग व मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा शाळेचे संस्थापक शेखर जैन, लिसा हिचे आई-वडील व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी लिसा हिचे अभिनंदन करून तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
