शहरात धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्या…

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची मागणी

⚡सावंतवाडी ता.१८-: शहरात राजरोसपणे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, घरफोटी आणि दुकानफोडी करणाऱ्या चोरट्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्याकडे केली आहे.

शहरात गेले तीन दिवस चोरीचं सत्र सुरूच आहे याबाबत आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी चोरट्यांना लवकरात लवकर जायबंदी करा असे आशयाचे निवेदन त्यांनी श्री.कोरे यांना यावेळी दिले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान म्हणाले शहरात फिरते विक्रेत्यांची संख्या गेले काही दिवस वाढत असून या फिरते विक्रेत्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांवर देखील याचा परिणाम होत आहे. या फिरत्या विक्रेत्यांना आळा घाला अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

यावेळी हिदायतुल्ला खान बाबल्या दुभाषी, इफतीगार राजगुर,पप्पू शेख, संतोष जोईल, नितीन सातपुते,राकेश नेवगी, गणेश निंबाळकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page