कोकण पर्यटन विकास महामंडळ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संदेश पारकर यांचा सत्कार

पर्यटनाच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्याच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल असे दिले आश्वासन

⚡वैभववाडी ता.१८संजय शेळके-: महाराष्ट्र शासनाच्या कोकण पर्यटन विकास महामंडळ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना नेते संदेश पारकर यांचा शिवसेना वैभववाडी तालुक्याच्या वतीने शिवसेना शाखेत सत्कार करण्यात आला. पर्यटनाच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्याच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन यावेळी संदेश पारकर यांनी दिले.

वैभववाडी तालुक्यातील शिवसेना संघटनेचा आढावा यावेळी श्री.पारकर यांनी घेवुन मार्गदर्शन केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदु शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संभाजी रावराणे, माजी नगरसेवक रवींद्र रावराणे, खांबाळे उपसरपंच गणेश पवार, स्वप्निल रावराणे, शिवाजी राणे, दिपक गजोबर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page