राष्ट्रवादीतर्फे कणकवली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा अनंत पिळणकर यांच्याहस्ते सत्कार

⚡कणकवली ता.१८-: राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेंद्र हुलावळे यांच्यासह बढती मिळालेले पीएसआय विनायक चव्हाण, बापू खरात यांचा सत्कार करण्यात आला.

कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून हुलावले योग्य जबाबदारी पार पाडत आहेत. कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या विनायक चव्हाण आणि बापू खरात यांना नुकतीच पीएसआय पदी बढती मिळाली आहे.यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सदस्य निलेश गोवेकर, रुपेश जाधव, समीर आचरेकर, प्रकाश सावंत, सागर वारंग, देवेंद्र पिळणकर, सुजल शेलार आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page