शेती अवजारांची देखभाल व दुरुस्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.१८-: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि गुरुकृपा कृषी सेवा केंद्र, वराड (ता. मालवण ) यांच्या संयुक्त विद्यमाने शेती अवजारांची देखभाल व दुरुस्ती या विषयीचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रशिक्षणात कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी व कृषी अधिकारी दिनेश लंबे यांनी कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेचा लाभ शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवरून लाभार्थ्यास कशाप्रकारे घेता येतो याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि. पुणे प्लांटचे तंत्रज्ञ आकाश होंडे व शेती अवजारांचे मॅकेनिक आकाश दळवी यांनी पॉवर टिलर, पॉवर विडर, ग्रासकटर, चेनसो यासह अन्य यंत्रांच्या हाताळणीविषयी मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक धनंजय गावडे यांनी मिठाच्या पाण्यातील भात बिज प्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता तपासणीविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

भात पिकावरील करपा, तांबेरा, उद्दबत्यासारख्या बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण होते याबद्दलही मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक नीलेश गोसावी, कृषी सहाय्यिका सुषमा धामापूरकर, गुरुकृपा कृषी सेवा केंद्राचे मालक सतीश वंजारी, आत्मा शेतकरी सल्ला समिती सदस्य उज्ज्वला दळवी, ग्रा. पं. सदस्य सोमा परब आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पवनकुमार सौंडगे यांनी केले. आभार कृषी पर्यवेक्षक मंदार सरमळकर यांनी मानले.

You cannot copy content of this page