भाजपमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने पुन्हा शिवसेनेत
⚡देवगड ता.१८-: तालुक्यातील वाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच विनायक घाडी यांनी काही दिवसांपूर्वी विकासाच्या मुद्द्यावर भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला होता. परंतु दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने ते पुन्हा शिवसेनेत स्वगृही नगरसेवक निवृत्ती (बुवा)तारी यांच्या उपस्थितीत परतले .
या वेळी त्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले यावेळी बांधकाम सभापती तेजस मामघाडी,माजी नगरसेवक विकास कोयंडे, सदस्य संगीता परब,अंकिता वाडेकर ,जेष्ठ शिवसैनिक पुरूषोत्तम वाडेकर,लाल्या परब,काका ढोके उपस्थित होते..वाडा गावच्या ग्रा प सरपंच ,सदस्य यांच्या माध्यमातून वाद ग्रा प चे इमारतीचे काम पूर्णत्वास गेले असून या पुढील काळात शिवसेनेच्या मार्फत पालकमंत्री उदय सामंत खास.विनायक राऊत व देवगड तालुका शिवसेनेच्या माध्यमातून निश्चितपणे वाडा गावची उर्वरित विकास कामे मार्गी लागतील असे त्यांनी सांगितले.
