⚡सावंतवाडी ता.१२-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा मंगळवार दि. ०९-०९- २०२६ रोजी जय गणेश हायस्कूल , मालवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या १४ वर्षाखालील विद्यार्थी गटात कु . शय्यान बेग, कु. अब्दुलआमिन निकारी कु. शादाब शेख , कु . अनस शेंडेवाले , कु . हबीब अथनिकर या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट क्रीडा कौशल्य दाखवत विजेतेपद पटकावून विभागस्तरावर धडक मारली. तसेच १७ वर्षाखालील विद्यार्थीगटात
कु. इब्राहीम शहा , कु . इनाया शेख ,
व १९ वर्षाखालील विद्यार्थी गटात कु . तकी बागवान या विद्यार्थ्यांची पुढील विभागीय टेबलटेनिस स्पर्धेसाठी वैयक्तिक निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा आणि शिक्षक
श्री . सिद्धेश साळसकर यांनी मार्गदर्शन केले . या खेळाडू विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रातील शाळेच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे .
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक कार्यकारिणी समिती पदाधिकारी यांनी विजेत्या संघाचे व सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील विभागीय टेबलटेनिस स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .
[
सेंट्रल इंग्लिश स्कूलचे जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत विजेतेपद; विद्यार्थ्यांची विभागस्तरीय निवड* …
