Headlines

वेंगुर्ला तालुका शिवसेना पक्षाची मासिक सभा संपन्न

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यात व शहरात रिक्त असलेल्या शाखाप्रमुखांच्या नेमणुका झाल्या असून आ. दिपक केसरकर यांच्या माध्यमातून शहरासह तालुक्यात शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जोमाने कार्य करण्याचा निर्णय शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी झालेल्या मासिक सभेत घेण्यात आला. वेंगुर्ला तालुका शिवसेना पक्षाची मासिक सभा शुक्रवारी बॅरिस्टर नाथ पै सभागृह येथे शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली व तालुकाप्रमुख बाळा दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेस वेंगुर्ला उपसभापती सचिन देसाई,
शहरप्रमुख अजित राऊळ,
उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, सत्यवान साटेलकर, युवा तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, युवा जिल्हाप्रमुख हर्षद डेरे , नगरसेविका समिधा रेडकर व लिना म्हापणकर, तुळस पं. स. सदस्य सुचिता वजराटकर, उभादांडा पं. स.सदस्य साक्षी नार्वेकर तसेच पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. नव्याने तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती झालेले बाळा दळवी यांनी तालुक्यात शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तळागाळात मोहीम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page