Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळ लक्ष्मीवाडी येथे बॅरिकेट्सवर मोटारसायकल आदळून अपघात

एक ठार तर एक गंभीर कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर रविकमल हॉल लक्ष्मीवाडीनजीकच्या ब्रिजवर रस्त्यावरील बॅरिकेट्सवर मोटारसायकल आदळून झालेल्या अपघात झाला. या अपघातात पावशी येथील एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज रात्री ८.३० च्या सुमारास झाला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडेbदाखल झाले आहेत

Read More

भाजपा युवा मोर्चाच्या इशाऱ्या नंतर नगरपरिषदेला आली जाग

‘तो’ कचरा उचलत केली स्वच्छ्ता मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील रेवतळे या वर्दळीच्या सागरी महामार्गाच्या दुतर्फा नागरिकांकडून टाकण्यात आलेल्या दुर्गंधीयुक्त कचऱ्याची महिनोंमहिने विल्हेवाट लावण्याकडे मालवण नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या भाजपा युवा मोर्चाचे मालवण शहराध्यक्ष ललित चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर श्री चव्हाण यांच्या इशाऱ्याने खडबडून जाग्या झालेल्या…

Read More

बांदा येथे पूर अलर्ट सायरनचे उद्घाटन

पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी केला शुभारंभ ⚡बांदा ता.०६-: बांदा शहरात पूर अलर्ट देण्यासाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या सहकार्यातून आळवाडी येथे बसविण्यात आलेल्या सायरनचे उदघाटन बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, सरपंच अक्रम खान, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता…

Read More

पूर्व सुरक्षितता म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफची एक टीम दाखल

नागरिकांनी सतर्क राहून स्वतःसह पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी, नदी पात्रात जावू नये;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: पूर्व सुरक्षितता म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफच्या 22 जवानांची एक टीम दाखल झाली आहे. नागरिकांनी नदीपात्रात जावू नये, सतर्क राहून स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज आपत्कालीन…

Read More

मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड…

गाडीच्या मागे आणि पुढे एकाच वेळी पडले झाड; सुदैवाने जीवितहानी नाही… वैभववाडी प्रतिनिधीमंगळवारी राञी ९.४५ वा. सुमारास जोरदार पाऊस पडत होता… रस्त्यावर पुढे आडवे झाड पडले म्हणून गाडी मागे घेत असताना मागेही रस्ते पिंपळाचे मोठे झाड पडले. सुदैवाने या अपघातातून कुसूर येथील नर्सरीचे मालक श्रीराम पळसुळे रा. कुसूर हे बालबाल बचावले आहेत. कुसूर ग्रामस्थांनी दोन्ही…

Read More

करुळ व भुईबावडा मार्ग बंद झाल्यास अधिकाऱ्यांची गाठ माझ्याशी…

आमदार नितेश राणे यांचा इशारा वैभववाडी संजय शेळकेकरूळ व भुईबावडा घाट मार्ग यापुढे बंद झाला किंवा रस्त्यातील खड्ड्यामुळे अपघात झाला तर अधिकाऱ्यांची गाठ माझ्याशी आहे. जनतेचे आपण सेवेकरी आहोत, यापुढे कामात चालढकलपणा, आळस चालणार नाही. कारणे चालणार नाहीत. कामे जमणार नसतील तर अधिकाऱ्यांनी खुर्च्या सोडाव्यात, बदली करून घ्यावी. आम्ही दुसरे अधिकारी नियुक्त करतो. पण यापुढे…

Read More

मुसळधार पावसामुळे कळणे सब पोलिस स्टेशनची पडझड…

दोडामार्ग ता.०६-: दोडामार्ग तालुक्यातील सर्वात जुने असलेले कळणे सब पोलीस स्टेशनची पडझड कालच्या पावसात झाली. एकाबाजूची भिंत कालच्या पावसात कोसळली. ही पोलीस चौकी कोरोनंतर बंदच होती असे इथले ग्रामस्थ सांगतात. या ठिकाणी ड्युटीवर पोलीस पण नसतो त्यामुळे इथल्या लोकांची गैरसोय होते आता सदरची चौकीची इमारतच कोसळल्याने इथल्या सुरक्षेच्या मर्यादाही समोर आल्या आहेत. कळणे पंचक्रोशीतील अनेक…

Read More

मनसेची कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौकात गांधीगिरी

रस्त्यावरील खड्डे बुजवत प्राधिकरण व प्रशासनाचा केला निषेध ⚡कणकवली ता.०६-: मनसेने गांधीगिरी करत प्रशासनाला जाग आणण्यासाठी अनोखे आंदोलन कणकवली येथिल आप्पासाहेब पटवर्धन चौकात केले. व रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवित महामार्ग प्राधिकरणाच्या प्रशासन व ठेकेदाराचा निषेध केला.तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रशासनाचे करायचे काय खाली डोके वर पार ‘ , ‘ मनसेचा विजय असो ‘ , ‘…

Read More

उपजिल्हा रुग्णालय परिसरातील झाड कारवर कोसळले…

कारचे नुकसान; झाड बाजूला करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू ⚡सावंतवाडी ता.०६-: उपजिल्हा रुग्णालय परिसरात असणारे झाड आज एका कारवर कोसळले असून, या अपघातात कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी हे झाड बाजूला करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू होते.

Read More

ट्रक – मोटरसायकल अपघातात मोटरसायकल चालक जखमी

बांदा – पानवळ येथील घटना ⚡बांदा ता.०६-: बांदा – पानवळ येथील गोगटे – वाळके महाविद्यालयासमोर ट्रक व मोटरसायकल यांच्यात अपघात होऊन मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला. नरेशकुमार गिरिधारीलाल ज्योतिषी (३५, रा. राजस्थान, सध्या रा. बांदा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात…

Read More
You cannot copy content of this page